राजगड : तालुक्यातील कोंढावळे खुर्द मध्ये शेतकऱ्याच्या मुलीला जीवंत गाडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात
तसंच १० ते १२ संशयितांविरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुरूवारी राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे ही घटना घडली होती. काही जणांनी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या मुलीच्या अंगावर जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला शेतामध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीमध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने या तरुणीच्या अंगावर माती टाकून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला होता. तरुणीने आपल्या आई आणि बहिणीसह याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यामुळे संबंधित महिलेने आपल्या मुलींसोबत पुणे अधिक्षक कार्यालयात धाव घेत तक्रार केली होती. त्यानंतर रात्री उशिरा वेल्हे पोलिसांनी याप्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी प्रणाली बबन खोपडे, तिची आई कमल बबन खोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेल्हे पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी संभाजी नथू खोपडे, तानाजी नथू खोपडे, बाळू भोरेकर, उमेश रमेश जयस्वाल या ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचसोबत या चौघांसोबत घटनास्थळावर आलेल्या 10 ते 12 अनोळखी लोकांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी ही माहिती दिली आहे.
प्रणालीच्या अंगावरील माती बाजूला काढून तिचा जीव वाचवला असे का म्हणते तरुणीच्या आई.
तरुणीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मी आणि माझ्या दोन मुली कोंढावळे खुर्द येथील शेतात काम करत होतो. त्यावेळी संभाजी खोपडे आल्यासोबत १५ ते १६ जण घेऊन आला होता. त्याने जेसीबी आणि ट्रॅक्टर सोबत आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे सांगले. यावेळी माझी मुलगी प्रणालीने विरोध केला होता. तेव्हा या सर्वांनी तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मी माझ्या दुसऱ्या मुलीच्या मदतीने प्रणालीच्या अंगावरील माती बाजूला काढून तिचा जीव वाचवला.
पुणे जिल्ह्यात चाललय तरी काय? – सुप्रिया सुळे
या घटनेत सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून राजगड तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला गेला ही घडलेली घटना ही अतिशय दुरदैवी असून या घटनेची मी निषेध करते. हेच तर मी महाराष्ट्र सरकारला विचारते की पुणे जिल्ह्यात चाललय तरी काय?
राज्य सरकार झोपले का? वंदना चव्हाण
अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. पुन्हा हे सुरक्षित ठिकाण मानलं जातं पण या घटनेनंतर राज्य सरकार झोपले का असा सवाल वंदना चव्हाण यांनी यावेळी केला. तर आम्ही या घटने संदर्भात पाठपुरावा करणार असल्याबाबत देखील त्यांनी सांगितले
विशेष पथके रवाना?
या घटनेतील सर्व संशयित फरार असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने ३ पोलीस पथके त्यांच्या शोधा करता रवाना करण्यात आले आहेत.