पुणेः शहरात १ सप्टेंबरच्या रात्री गोळीबाराच्या घटनेत मा. नगरसेवक वनराज आंदेकर (vanraj andhekar murder) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मयत वनराज यांचा मृतदेह नाना पेठेतील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला आहे. नाना पेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर ठिकठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराकडून श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील या ठिकाणी पाहिला मिळत आहे.
वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेत पाच वर्ष नगरसेवक राहिलेले होते. यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. तसेच काम करणारा माणूस अशी ओळख त्यांची जनमाणसांत होती. त्यामुळे सकाळपासून येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर मित्रपरिवाराकडून श्रद्धांजलीसाठी बॅनर लावण्यात आलेले आहेत.