पुणेः (प्रतिनिधी वर्षा काळे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांच्या ‘जन सन्मान यात्रेला’ चांगला प्रतिसाद मिळत असून, ही यात्रा आज पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांतून गेली. विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यंपूर्वीच सुरू झालेली ही यात्रा, महायुती सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अजित पवारांच्या नेतृत्वात लोकांशी संपर्क साधण्याचा हा प्रयत्न आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ २ कोटी महिलांपर्यत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच भर सभेत पवार यांनी अधिकाऱ्यांना पाहिजे तेवढा निधी घ्या, पण विकास कामे थांबू देऊ नका. असे सांगितले.
पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगावमधील नाथुभाऊ भेगडे शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात, महिलांच्या सभेला संबोधित करताना अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या सरकारने माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत ९० लाखांहून अधिक लाभार्थ्याच्या खात्यात ३००० रुपये पाठवले आहेत. महिलांच्या सक्ष्मीकरणासाठी आपली वचनबद्धता स्पष्ट करताना त्यांनी म्हटले
की,’ या योजनेचा लाभ महिलांना देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे.” त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, मावळमधील विकास कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शोळके यांना राज्य सरकारने २८०० कोटी रुपये वितरित केले आहेत.”
‘कुमार रिसॉर्ट्स, लोणावळा येथे हॉटेल आणि फार्म स्टे मालकांशी संवादादरम्यान, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना राज्यातील विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ‘हव्या तेवढ्यया निधीचा वापर करा, पण विकास कामे थांबता कामा नये. राज्याच्या तिजोरीत पुरेसा पैसा आहे,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. लोणावळा हे राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. लोणावव्यातील विकास प्रकल्पांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, पीएमआरडीएने ३३३.५६ कोटी रुपये किमतीच्या ग्लोबल स्कायवॉक प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे. ४० पर्यटनस्थळांवर थीम पार्क्स विकसित केले जात आहेत, आणि राज्य नव्या पाण्यावरील पर्यटनाच्या संधी शोधण्यासाठी काम करत आहे.” या कार्यक्रमांमध्ये वित्त विभागात काम करणाऱ्या महिलादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राख्या बांधताना दिसल्या. येत्या काही महिन्यांत राज्याची विधानसभा निवडणूक होणार असल्याने अजित पवार नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.