सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव
पुण्यातील विमानगर भागातील एका २९ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत तसेच मारहाण करीत तिची ५ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नामक आदित्य श्रीवास्तव याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार अॅाक्टोबर २०२२ ते जुन २०२४ या कालावधीत घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादीचा मानसिक, आर्थिक आणि लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक छळ केला. तसेच फिर्यादी यांना अंधारात ठेवत दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. ही गोष्ट फिर्यादी यांना माहीत झाल्यावर त्यांनी याविषयी विचारण केली असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ५ लाख रुपयांची आर्थिक तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याकडून आरोपीने ८० लाख असे एकूण मिळूण ८५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.