भोरः राज्यातील खोके सरकार, पक्ष फोडणारे व दलबदलू नेते या सर्वांना जनता कंटाळली असून, त्याची प्रचिती लोकसभेच्या निकालात पाहिला मिळाली. त्यामुळे त्यांनी कितीही फसव्या योजना आणल्या किंवा वेगवेगळी प्रलोभने जनतेला दाखवली, तरी जनता आता याला बळी बडणार नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. मुळशी तालुक्यातील गावांना भेटी देऊन ते नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यासह मतदार संघाच विकासाला अधिक चालना मिळेल, असा ठाम विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मुळशी तालुक्यातील काशिंग, हाडशी, भालगुडी, वाळेण, कोळवण, डोंगरगाव, होतले, साठेसाई, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, कुळे, दाखणे, चाले, मुगावडे, सावरगाव, करमोळी, दारवली, अंबटवेट, भरे, लवळे, नांदे या गावातील नागरिकांशी संग्राम थोपटे यांनी संवाद साधला. यावेळी महादेव आण्णा कोंढरे, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, भानुदास पानसरे, तुकाराम आबा टेमघरे, शिवाजी जांभुळकर, अविनाश बलकवडे, रामदास साठे, आंनदा आखाडे, लक्ष्मण ठोंबरे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ, सविता दगडे, सुरेखा तोंडे, दिपाली कोकरे, स्वाती ढमाले, निकिता सणस, गौरी भारतवंश यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने प्रमुख असलेले पौड-कोळवण-काशिंग-फागणे हे रस्ते व वळकी नदीवरील पूलाचे काम तसेच म्हाळुंगे-नांदे-चांदे-मुलखेड-घोटावडे-चाले रस्त्यांची कामांसाठी निधीची तरतूद करून ही सर्व कामे मार्गी लावली असल्याची माहिती संग्राम थोपटे यांनी दिली. त्याचबरोबर गावागावातील जोडरस्ते, सभामंडप, पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते अशी अनेक विकास कामे आमदार आणि स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती यांची अंतर्गत कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इथली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.