Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

समस्या वाहतूक कोंडीचीः कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरुन दिवसाला १ लाखाच्यावर वाहनांचा प्रवास: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

वाहतूक समस्यांसंदर्भात सर्वांना एक व्हॉट्सॲप नंबर द्याः मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

by SBPRNL
September 10, 2024
समस्या वाहतूक कोंडीचीः कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरुन दिवसाला १ लाखाच्यावर वाहनांचा प्रवास: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

पुणेः  कोथरुडमधील वाहतूकीच्या समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पाटील यानी कोथरुडमधील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल, असे निर्देश या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी दिले. या बैठकीमध्ये अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरून दिवसाला एक लाखांच्यावर वाहने फिरत असल्याचे सांगत वाहतूक नियमनासाठीच्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

या सादरीकरणामध्ये प्रामुख्याने पौड रस्ता आणि कर्वे रस्ता येथील अभिनव चौकच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद करणे, आनंदनगर मेट्रो स्टेशनजवळ पौड रोड रुंद करणे, कर्वे पुतळा पौड रस्त्याचे डावे वळण रुंद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कर्वेनगर ते वारजेपर्यंतचा रस्ता रुंद करणे किंवा या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, कमीन्स गेट समोरील डी. पी. रस्ता रुंद करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील रस्ता रुंद करणे, यांसह वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी कोथरुडमधील मिसिंग लिंक शोधून त्या पूर्ण करणे.  रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जमीन हस्तांतरण आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पथ विभागाने समस्यांचे निराकरण करावे आदी उपाययोजना आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितल्या.

यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांच्या सह वाहतूक पोलीस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा संदीप खर्डेकर 

तसेच वाहतूक शाखेला मनुष्यबळ कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवावी. त्याशिवाय वाहतूक नियमनासंदर्भात जनजागृतीसाठी एनएसएसची मदत घ्यावी अशा देखील सूचना पाटील यांनी केल्या. कोथरुडमधील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिली.

कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर बनली असून, प्रशासनाने दोन पर्यायांवर काम करावे. त्यामध्ये दीर्घ कालीन उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यातील निष्कर्षांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन मार्ग काढू.

– मंत्री चंद्रकांत पाटील

Tags: chandrakantpatilPunerajgadnerwstrafic
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group