राजगड न्युज लाईव्ह| कुंदन झांजले
भोर: शहरात आज मंगळवार (दि १९) भोर पोलीस स्टेशनकडून पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी भोर स्टेशन हद्दीतील पोलीसांचा रुट मार्च फेरी काढण्यात आली .
शहरातील शिवतीर्थ चौपाटी पासून नगरपालिका बाजारपेठ मुख्य रस्ता, मंगळवार पेठ, एसटी स्टँड, तहसीलदार कार्यालय राजवाडा रस्ता ते नवी आळीतुन पोलीस स्टेशन पर्यंत रूट मार्च करण्यात आला यावेळी भोर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, महिला पुरुष पोलीस उपस्थित होते.
आज मंगळवार आठवडे बाजार असल्याने पोलिसांचा रूट फेरी पाहून बाजारातील व शहरातील नागरिकांमध्ये शहरासह तालुक्यात शांतता व सुरक्षितता प्रस्तापित करण्यासाठी पोलिस सक्षम व जागरूक असल्याचे बाजारातील नागरिकांकडून सांगण्यात आले.