Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक, २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

by SBPRNL
July 14, 2025
पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक, २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नसरापूर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील केळवडे (ता. भोर) येथील एचपी कंपनीच्या “राजगड मेट्रो पावर स्टेशन” या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा एकूण २०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पहाटे १.२५ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात युवक दोन अ‍ॅक्सेस दुचाकींवरून पेट्रोल पंपावर आले. त्यांनी संग्राम कांबळे (वय १८, रा. कांजळे, ता. भोर) या कर्मचाऱ्याला धमकावून व्हिवो व सॅमसंग मोबाईल आणि ६,००० रुपये रोख असा ऐवज जबरदस्तीने चोरला. या प्रकरणी बीएनएस ३०९ (४), ३ (५) व आर्म अ‍ॅक्ट ४ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

You might also like

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपी पुण्यातील कात्रज परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खेडशिवापूर येथे सापळा रचून समीर हकीक खान (१८, रा. भारतनगर, कात्रज), महेंद्र ठाकूर (१९, रा. जांभुळवाडी, पुणे) व चार अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत करण सकट (रा. कात्रज) यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, ३,००० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश गवळी, सपोनि दत्ताजीराव मोहिते, सपोनि तुकाराम राठोड, पोसई अजित पाटील, तसेच पोलीस अंमलदार अमोल शेडगे, अतुल डेरे, रामदास बाबर, अजित भुजबळ, मंगेश भगत, धीरज जाधव व अक्षय नलावडे यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Tags: crime
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड
क्राईम

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

July 19, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
Next Post

Bhor - बारे बुद्रुकला पुण्यातील राष्ट्रीय सेवेच्या विद्यार्थ्यांचा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group