मनोज खंडागळे : यवत
यवत दि.०५ : दौंड तालुक्यातील वरवंड येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवार दि.०५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने दौंड तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी दौंड तालुक्याचे जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह दौंडचे आमदार राहुल कुल, वसुदेव काळे कांचन कुल संग्राम कोते प्रदीप गारटकर, तुषार थोरात प्रेम सुख कटारिया अनिल सोनवणे आणि महायुतीचे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रमेश थोरात आणि राहुल कुल यांनी आपले मनोगत व्यक्त करत सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
उद्याच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार, मोदी सरकार देशात येणार असून विकासाचे नवे पर्व म्हणजे महायुती असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना केले. पुढे अजित पवार म्हणाले कि,रमेश थोरात, राहुल कुल आम्ही सर्वांनी मिळून राज्याच्या निधी आपल्या तालुक्यात आणला आहे. यामध्ये दौंड तालुक्यातील शेतीच्या प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे यासाठी राज्य सरकारच्या निधी सोबतच केंद्राचा निधी पाहिजे असल्याने मी महायुती सोबत गेलो आहे. दहा वर्षात बारामती लोकसभेच्या खासदार किती निधी आणला तू नेते राज्याचा आहे केंद्र सरकारचा नाही त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हा कमी पडला आहे बाकीच्या तालुक्यात काही मिळाले नाही ज्या ठिकाणी महायुतीचे खासदार आहेत त्या ठिकाणी राज्य सरकार सोबत केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून त्या ठिकाणी विकास झालेला आहे असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
मी सत्यकथा पदाकरता महायुतीत गेलो नाही लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील विकास करायचा असेल तर सत्तेत असणे फार गरजेचे आहे. गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळत नाही परंतु आचारसंहिता संपू द्या काहीच दुधाचे पाच रुपये अनुदान हे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय राहणार नाही असे देखील आश्वसन अजित पवार यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
दौंड पुणे लोकल सेवा सुरू करण्याच्या प्रयत्न मागील खासदार सुप्रिया सुळे यांनी किती वेळा केला असा देखील सवाल त्यांनी यावेळी केला. खडकवासला पाणी प्रश्न बुडीत बंधारा,निरा नदीवर बॅरेज, निरा डावा कालवा दौंड इंदापूर बारामती, हवेली याला जादा पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन, जानाई शिरसायी योजना लाकडी निंबोळी पाणी योजना याच्या बाबतीत सुधारणा व योजना करणे त्याचबरोबर टाटाचे पाणी आपल्या इकडे घ्यायचे आहे त्यासाठी टाटाच्या धरणाची उंची वाढऊन त्याचे नियोजन करणे, नदी क्षेत्रामध्ये वाढणारी जलपर्णी यासाठी योजना करणे याबाबत अनेक प्रश्नांसाठी मी कटिबद्ध आहे..
आमचा स्वार्थ समाजाचे भले करण्याचे आहे. टाटाचे वीज तयार करण्यासाठीचे पाणी वाचून ते पाणी आपल्याकडे वळवू, त्यांचे जेवढे वीस तयार होईल त्यांना सरकारकडून मी उपलब्ध करून देऊ यासाठी त्यांचा खर्च सरकार करेल असे देखील या वेळेस अजित पवार यांनी सांगितलं.
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल लोक…
काल वरवंड येथे सुप्रिया सुळे यांची प्रचाराची सांगता सभा पार पडली तेव्हा दौंडच्या पूर्व भागातील नागरिकांना व शेतकऱ्याना ऊस, पाणी, वीज याबाबत दम दिला जात असल्यामुळे कोन मायचा लाल आहे जो दौंडला पाणी सोडणार नाही दौंड करांच पाणी अडवणार असे अजित पवारांचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती या टिकेला उत्तर देत अजित पवार यांनी आम्हीच कष्ट घेऊन तुम्हाला लोकसभा निवडणुकीत निवडून आणली आहे. धरणात पाणी शिल्लक नाही हे त्यांना काय माहित याची माहिती त्यांनी घ्यावी, हसत भावकी वर बोलायचं नाही त्यांचा त्याना लखलाभ सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले लोक आहेत असे उत्तर अजित पवार यांनी दिले.