भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मा. खा. अशोक मोहोळ यांनी व्यक्त केला. यावेळी नाना नवले, देवीदास भन्साळी, कौस्तुक गुजर, श्रीरंग चव्हाण, स्वरुपा थोपटे, सविता दगडे, महादेव कोंढरे, शैलेश सोनवणे, विठठल आवाळे, अभिषेक येलगुडे, सदीप नांगरे, माऊली शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रसाद शिंदे, पृथ्वीराज थोपटे, बाळासाहेब थोपटे ,सुभाष कोंढाळकर, महेश टापरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या सभेला सुमारे १५ हजार नागरिक उपस्थित होते.
प्रस्ताविक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी केले. भोर विधानसभेला आमदार संग्राम थोपटे यांना मुळशी तालुक्यातून एक नंबरचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी व्यक्त केला. तर अशोक मोहोळ म्हणाले, आमदार थोपटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. यातच थोपटेंचा विजय असून मूळशी तालुका थोपटेंच्या मागे कायम आहे. लाडकी बहिण राज्यात सुरु आहे. मात्र मध्यप्रदेश म्हणजे महाराष्ट्र नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. लोकांना विकत घेऊन सरकार चालवले जात आहेत. खोटे प्रचार दहशत वाढवली जात आहे, हे खोडून काढायचे आहे. म्हणून आघाडीचे सरकार आले पहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
जोरदार शक्तीप्रर्दशन
आमदार संग्राम थोपटे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभेनंतर भोर महाड रस्त्यावरील अनंतनगर झोपडपट्टी व चौपाटी शिवाजी महाराज पुतुळा येथे जेसीपी मधून त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली. महाराजांच्या पुतुळयाला आमदार संग्राम थोपटे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी फुलांची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. वेताळपेठ येथे व नगरपलिका चौकात मोठा हार घालण्यात आला. घोषणा देत मंगळवार पेठेतून रॅली राजवाडा चौकात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तहसिल कार्यालयात निवडणुक अधिकारी डॅा. विकास खरात यांच्याकडे आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.