नसरापूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड अंतर्गत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय आविष्कार २०२४ स्पर्धेत प्युअर सायन्सेस या वर्ग श्रेणीत नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी बापू चव्हाण हिने कांस्य पदक मिळविले.
मयुरी चव्हाण ही औषनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवीच्या फार्माकोलॉजी या शाखेची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून तिच्या विशेष अशा नावीन्यपूर्ण स्टेम सेल्स वरील प्रकल्पावरील विचारांना कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. मयुरी चव्हाण ला सदर प्रकलपासाठी फार्माकोलॉजी चे प्राध्यापक डॉ. अजय काळे व प्राचार्य डॉ. किशोर ओतारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सहभागी घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, समूह संचालक सागर सुके, उपाधक्ष्या सायली सुके, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.