रस्त्यांवर समोरून येणारी गाडी दिसत नाही नागरिकांची झुडपे छाटण्याची मागणी
भोर पसुरे व भोर महुडे मार्गावर रस्त्याच्या कडेला असणारी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांना कडून या मार्गावर असलेल्या साईट पट्ट्या वाढविणे, खड्डे बुजवणे,व रस्ता वळणावरील, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडं झुडपे छाटण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.
या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते .सकाळी भल्या पहाटे व सायंकाळी रात्रीच्या वेळी कामावरून घरी येताना जाताना वाहन चालकांना , नागरिकांना,व शाळकरी मुलांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी गाडी दिसत नाही पटकन येणारी गाडी आणि रस्त्यावर दोन वाहने बसत नसल्याने नंतर होणारी तारांबळ,अडचण यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. काही वेळेस तर रस्त्याची साईट पट्टी खचल्याने, खोलगट स्वरूपाची झाल्याने मोठी वाहन आल्यानंतर दुचाकी बाजूला घेताना दुचाकी स्वारांचे छोटे मोठे अपघातही घडले आहेत. भोर शहरात प्रवेश करताना तर दोन्ही पुलावर पाण्याचे तळे व खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे संबंधित विभागाने रस्ता बुजवण्याचा प्रयत्न केला तरी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच रस्त्यावर मोठी रहदारी असल्याने रस्त्यावर खड्डे मात्र पडतच आहेत.
“मी भोर पसूरे रस्त्यावरून दररोज कामावर जाण्यासाठी प्रवास करत असतो . परंतु जसा पावसाळा सुरू झाला आहे तशी मार्गावरील रस्त्याची , साईट पट्टी, वळणावरील झुडपांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता अरुंद असल्याने समोरून मोठी गाडी आली की गाडी कोठे थांबवावी हे समजत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या समस्या सोडवुन रस्ता सुखकर बनवावा”. ज्ञानेश्वर(माऊली)बदक -सामाजिक कार्यकर्ते बारे खुर्द