पुणेः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांसर्दभात बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा सकारात्मक चर्चा करुन कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
या बैठकीला आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता बोरकर, समाजकल्याण विभाग अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नलावडे, भोर-राजगड-मुळशी तालुक्याचे गटविकास अधिकारी, मा. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, मा. पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे आदी उपस्थित होते.
या बैठकीत पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम, आंबवडे पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी पदांबाबत, करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्र लस उपलब्धतेबाबत, तळे म्हसवली पाणीपुरवठा योजना, डेहणे कोंडगाव पाणीपुरवठा योजना, चिरमोडी गुंजवणे इजिमा ९१ रस्ता दर्जोन्नती, हातनोशी व कुरुंदवाडी उपसा सिंचन योजना, जिल्हा परिषद स्थानिक स्तर प्रस्तावित कामे तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध प्रस्तावित कामांबाबचा आढावा आमदार थोपटे यांनी घेतला. तसेच यासंदर्भात चर्चा करुन ही कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.