सासवड (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे आवारात नुकतीच पार पडली. परिषदेचे अध्यक्ष ॲड आण्णासाहेब खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेस आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सासवडची साहित्य परिषद शाखा दरवर्षी विविध साहित्यविषयक उपक्रम राबवत असते यात जानेवारीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, कवी संमेलन, मराठी भाषा दिवस साजरा करणे,१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, साहित्य परिषदेच्या प्रथमा व प्रवेश परीक्षांचे आयोजन याच बरोबर अत्रे प्रतिष्ठानच्या सहयोगातून आचार्य अत्रे यांच्या जयंती दिनी व पुण्यतिथी दिनी विविध पुरस्कार तसेच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते या वार्षिक सभेत साहित्य पर्यटन या अंतर्गत जाऊ साहित्यिकांच्या गावा हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे ठरवण्यात आले.
वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडण्यात आलेली कार्यकारणी या प्रमाणे विजय कोलते, ॲड प्रकाश खाडे,ॲड दिलीप निरगुडे, हेमंत ताकवले, सुनील लोणकर, वसंत ताकवले, संदिप टिळेकर, केशव काकडे, कुंडलिक मेमाणे, ॲड कलाताई फडतरे, डॉ राजेश दळवी, संतोष काकडे, सतीश पाटिल, सुरेश कोडीतकर, जगदीश शेवते, बबन तावरे व सौ रमेश विद्या जाधव. सभेचे इतिवृत्त वाचन शिवाजी घोगरे सर यांनी केले तर कार्यक्रमाविषयी कार्यवाह सतीश पाटील यांनी माहिती दिली. विजय कोलते यांनी मार्गदर्शन केले तर ॲड प्रकाश खाडे यांनी आभार मानले. त्रिंबक माळवदकर, बाळासो मुळीक, दिलिप वारे, बंडुकाका जगताप, विजया गाटे, रमेश जाधव, दिलिप पापळ, दादा मुळीक, शांताराम कोलते, अक्षद्य पवार यांसह अनेक साहित्य प्रेमी या प्रसंगी उपस्थित होते.