भोरः सध्याच्या काळात पाल्य व पालक यांच्यात संभाषणाचा अभाव दिसून येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. यातून काय बरोबर आणि काय चूक याची समज मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी पाल्य-पालक यांचा संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ज्या काही घटना आता घडत आहे, त्या आपण पाहतच आहोत. यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खास व्याख्यानमालाचे आयोजन भोर राजगड(वेल्हे) सामाजिक शैक्षणिक व क्रीडा प्रतिष्ठान तसेच कुलदीप तात्या कोंडे युवा मंच भोर-राजगड- मुळशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही व्याख्यानमाला बुधवार दि.४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय वेल्हे नसरापूर रोड, कोंढावळे फाटा, ता. राजगड, जि. पुणे या ठिकाण आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे घेणार आहेत. जास्त जास्त विद्यार्थ्यी आणि पालकांनी या व्याख्यानमालेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.