महिलांनी हिंदू धर्म संस्कृती आचरणातून दुर्गा देवीच्या शक्तीची उपासना करणे काळाची गरज -प्रा श्रीकांत बोराटे
भोर :- आज देशात लव्ह जिहादच्या माध्यमांतून हिंदू महिलांवर होणारे अत्याचार आणि हत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. एकंदरच धर्मशिक्षणाच्या अभावी आणि पाश्चात्य कुसंस्कृतीच्या अंधानुकरण यांमुळे महिला धर्म संस्कृती यांपासून दूर जाऊन लव्ह जिहाद सारख्या प्रसंगात बळी पडत आहेत. विज्ञान युगातील पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, मोबाईलचा अतिरेकी वापर, हिंदू धर्म संस्कृती, चालीरीती,रुढी- परंपरा यांचा पडत चाललेला विसर या सर्व गोष्टी यास जबाबदार आहेत. या सर्वांपासून रक्षण करायचे असेल तर सर्व महिलांनी आपल्या हिंदू धर्माचे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करून दुर्गादेवीच्या शक्तीची उपासना केली पाहिजे हीच काळाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन हिंदू धर्म जनजागृती समितीचे प्रा.श्रीकांत बोराटे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त मोहरी खुर्द(ता.भोर) येथे केले.
येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महिला सशक्तीकरण आणि लव्ह जिहाद या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले होते यावेळी प्रा. श्रीकांत बोराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धर्मशिक्षण, धर्म रक्षण, आपली संस्कृती, रुढी ,परंपरा, स्वसंरक्षण,देव ,देश यांचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे असे सांगितले. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर महिलांनी , तरुणींनी अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी सशक्त, सक्षम झाले पाहिजे असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी केले.यावेळी मोहरी खुर्द गावातील युवक, युवती, महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.