भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ भोर – राजगडच्या वतीने शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा २०२४ चा”नेशन बिल्डर अवॉर्ड (पुरस्कार)” येवलीच्या काजल चंद्रकांत कापरे यांना शनिवार (दि.२०)प्रदान करण्यात आला. भोर येथील सोनाली गार्डन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब नवले, सचिव नारायण वाघ, कृष्णा तामकर व भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संपत मळेकर, डॉ. आनंद कंक, जेष्ठ पत्रकार संतोष ढवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपले पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यावर काजलने आसपासच्या परिसरातील गरीब ,दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिकवणी देऊन त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला. रोटरी क्लब तर्फे दरवर्षी अशा प्रकारच्या शैक्षणिक योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आपल्याला अनमोल असुन पुढील भविष्यातील कार्यासाठी प्रेरणादायी आहे असे काजलने सांगितले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांसह व रोटरीच्या माजी अध्यक्षा सुवर्णा मळेकर यांनी काजल कापरेचे कौतुक केले.