नसरापूर : महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जोगवडी गावातील ४ किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तहसीलदार भोर यांच्या आदेशाने व विद्यमान सरपंच अश्विनी रविंद्र धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या महत्त्वपूर्ण सोहळ्यास गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच माया सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनाळे रावसाहेब, तलाठी मैंद, राठोड, ग्रामविकास अधिकारी जालिंदर कळंबकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. याशिवाय गावाचे माजी सरपंच राजेंद्र धुमाळ, संतोष धुमाळ, सुभाष धुमाळ तसेच पोलिस पाटील उर्मिला धुमाळ व माजी उपसरपंच गणपत धुमाळ,उद्योजक रविंद्र धुमाळ, विकास धुमाळ, नारायण भाऊ धुमाळ, किसन आलगुडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर होतील आणि वाहतुकीला मदत होईल. शासनाच्या या योजनेंतर्गत अनेक गावांना दर्जेदार रस्ते मिळत असून, ग्रामीण भागाचा विकास अधिक वेगाने होत आहे.
या वेळी बोलताना सरपंच अश्विनी धुमाळ यांनी शासनाच्या विविध योजना गावात राबवण्याची ग्वाही दिली. ग्रामस्थांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढील विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व प्रशासनाने परिश्रम घेतले.