भोरः दरवर्षीप्रमाणे भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संचलनामध्ये भोरेश्वर व रायरेश्वर येथील एकूण 273 संघाचे स्वयंसेवक गणवेशात व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते. पथसंचलनाची सुरूवात संत गाडगेबाबा प्राथमिक शाळेपासून करण्यात आली. हे संचलन भोर पोलीस स्टेशन मार्गे चौपाटी येथून नगरपालिकेमार्गे मंगळवार पेठेमधून राजवाडा चौक इथपर्यंत करण्यात आले.
भोरमधील सर्व हिंदू बांधवांनी या पथसंंचालनाचे स्वागत ठिकठिकाणी रांगोळी तसेच पुष्पवृष्टी व आतिषबाजी करून मोठ्या दिमाखात केले. ज्याप्रमाणे हिंदू समाजातील पराक्रमाचे जागरण श्री विजयादशमीच्या पवित्र सणाने केले जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा हिंदू समाजाच्या संघटनेचे शक्ती प्रदर्शन हे विजयादशमीच्या संचालनाने संपूर्ण भारतात करत असतो. त्या पार्श्वभूमीवर हे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले.