भोर :राजगड न्यूजने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमुळे महसूल विभागाला जाग आली आणि धांगवडी येथील औद्योगिक शेड उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमावर अखेर कारवाई करण्यात आली आहे.
राजगड न्यूजने औद्योगिक शेडवर वापरण्यात आलेल्या अनाधिकृत मुरमावर प्रकाश टाकला होता. या मुरमा साठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती औद्योगिक शेड साठी वापरण्यात आलेला मुरूम पूर्णपणे अनधिकृत असून यामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी तत्परता दाखवत त्या अनधिकृत मुरामावर कारवाई करत पंचनामा करण्याचे तोंडी आदेश स्थानिक तलाठी परमेश्वर जाधव यांना दिले त्यानुसार तलाठी जाधव यांनी कारवाई करत दोन समक्ष पंचासह प्रथम दर्शनी धांगवडी तालुका भोर येथील दिनेश राठोड व इतर यांच्या नावे असलेल्या गट क्रमांक १५४/१ मध्ये सुमारे २१८७ ब्रास अनधिकृत मुरमाचा वापर करण्यात आल्याचे पंचनाम्यात म्हंटले असून यामध्ये अनधिकृत मुरूम वापरल्याप्रकरणी अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपये दंड होणार आहे.या कारवाईमुळे अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राजगड न्यूजने या प्रकरणाचा पाठपुरावा करत महसूल बातमी प्रसिद्ध केली होती. तसेच, या प्रकरणाची दखल घेण्यासाठी बातमी द्वारे प्रकाश टाकत विनंती करण्यात आली होती.या प्रकरणात राजगड न्यूजने केलेल्या पत्रकारितेमुळे अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांनी महसूल विभागाकडे परवानगी साठी भाग पाडले आहे.
यामुळे शासनाची होणारी फसवणूक व महसूल बुडविनाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे.या कारवाईमुळे धांगवडी परिसरातील इतर अनधिकृत मुरूम वाहतूक करणाऱ्यांना समज मिळाली असून भविष्यात अशा प्रकारचे होण्यापासून प्रतिबंध होण्यास मदत होईल.
आपण प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश दिले असून प्रशासनाचा महसूल बुडविनाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे तसेच या कारवाईत काही शंका आढळल्यास स्थानिक PWD अधिकारी यांची मदत घेऊन जागेचा पुन्हा फेर पंचनामा करणार – राजेंद्र कचरे,प्रांताधिकारी भोर
कारवाई करण्यात आली!
औद्योगिक शेड साठी वापरण्यात आलेला मुरूम हा अनधिकृत असून जागेवर असलेल्या मुरमाचा पंचनामा करण्यात आला.या ठिकाणचा पंचनामा केला असून पुढील करवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे – श्री जाधव तलाठी धांगवडी
राजगड न्यूजचे हे यश वाचकांसाठी प्रेरणादायी आहे आणि भविष्यातही अशा प्रकारच्या सामाजिक गैरव्यवहारांवर प्रकाश टाकण्यासाठी राजगड न्यूज वचनबद्ध आहे.- जीवन सोनवणे,संपादक राजगड न्युज लाईव्ह
क्रमशः