जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेला आरोपी भोर तालुक्यातून अटक!
पुणे: कात्रज ते नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक येथे 5 मे रोजी सकाळी 11 वाजता विलास जयवंत बांदल (वय 55) यांचा निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे मुलगा अभिषेक बांदल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील जमिनीच्या वादातून मारले गेले आहेत. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी संतोष ऊर्फ पप्पु पाबेकर (वय 45) याला ओळखून काढले.
आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्यामुळे त्याला पकडण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करून शोध घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांना आरोपी रावडी (ता. भोर) येथे त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे, अशी माहिती मिळाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम आणि सचिन गाडे यांच्या टीमने रावडी येथे जाऊन शोध घेतला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, स्मार्तना पाटील पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, नंदीनी वग्याणी, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.