साईटपट्टी गटार तुंबल्याने रस्ता वाहुन गेला , अपघात होण्याची दाट शक्यता
भोर शहराच्या जवळील भोलावडे गावच्या हद्दीतील पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळ साईट पट्टी गटार तुंबल्याने पावसाच्या पाण्याने सदरील गटारातील पाणी रस्त्यावर वाहून गेल्याने सदरचा रस्ता वाहून गेला आहे त्यामुळे येथे भला मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.तसेच या खड्ड्यामुळे या ठिकाणी अपघात होणाची दाट शक्यता निर्माण झाली आहे .
भोर कापुरव्होळ पुणे ,तसेच भोर – महूडे ,भोर -पसुरे, पुण्यावरून भोर अशा ठिकाणच्या वाहनांची ,प्रवाशांची या रस्त्यावरून नेहमी वाहतूक वर्दळ असते तसेच शेजारीच एक महाविद्यालय व इंग्लिश मिडीयम स्कूल आहे त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करीत असतात संबंधित प्रशासनाने या रस्ताची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पेट्रोल पंपाजवळील गटार तुंबल्याने हा रस्ता पावसामुळे वाहुन गेला आहे व येथे मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे या गटारांची प्रथम साफसफाई तेथील स्थानिक संबंधित प्रशासनानी करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.भोर कापुरव्होळ रस्त्यावर पेट्रोल पंप ते बुवासाहेबवाडी रस्ताची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. भोर पसुरे रस्त्यावर भोलावडेतील वजन काटाजवळ देखील रस्त्याला खड्डे व रस्ता खराब झाला आहे.या रस्त्याची साईड पट्टी खचली आहे याची दखल देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी असेही प्रवासी नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.