पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) पुणे दौऱ्यावर असताना सर्किट हाऊसकडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वराचा व रिक्षाचा अपघात झाला. अजित पवार यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघात ग्रस्त व्यक्तीला धीर दिला व त्याची विचारपूस करत त्याच्याशी संवाद साधला.
तसेच अपघातग्रस्त यांच्यावर त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले. त्यानंतर आपल्या पुढील कामासाठी अजित पवार हे रवाना झाले. तसेच त्यांच्या ताफ्यातील डॉक्टरला अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करण्याच्या दिल्या त्यांनी दिल्या. तसेच अजित पवारांनी रिक्षा चालकाचा शोध घेण्यास सांगितले आहे.