Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गणेश विसर्जन :बसरापुरचा नदी घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज, दरवर्षी शेकडो गणेश मूर्तींचे होते विसर्जन

ग्रामपंचायतीकडून‌ व पोलीस प्रशासनाकडून सुचना फलकाद्वारे जनजागृती

by कुंदन झांजले
September 12, 2024
गणेश विसर्जन :बसरापुरचा नदी घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज, दरवर्षी शेकडो गणेश मूर्तींचे होते विसर्जन

भोर: शहरापासून दोन कि मीअंतरावर असलेल्या बसरापूर गावचा  नदी घाट यावर्षीही गणेश विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह अनेक आजूबाजूच्या गावातून परिसरातून तसेच भोलावडे ,भोर शहरातून अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात या गणेश मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन व्हावे तसेच नदी घाट परिसर कसा स्वच्छ राहील याकडे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व या गावचे स्वच्छता दूत पोलीस मित्र केशव साळुंके यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

नदीकिनारी जागोजागी निर्माल्य कोठे टाकावे , निर्माल्य पाण्यात टाकु नका, स्वच्छता राखा, पाण्यात कचरा टाकू नका, खोल पाण्यात उतरू नका , मुर्तीची विटंबना होणार नाही ,कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्या. अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले. देव देवतांच्या फोटो, काचेच्या वस्तू ,थर्माकोल, प्लास्टिकच्या बाटल्या, हार फुले , प्लास्टिकच्या माळी,पुजेचे साहित्य अशा कोणत्याच प्रकारच्या वस्तू निर्माल्य पाण्यात न टाकण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांना या ठिकाणी पाण्यात न उतरण्याचे देखील सांगण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तसेच मागील पंधरा वर्षांपासून या नदीकिनाराचा नदीघाट, नदी परिसर ,स्वच्छता राखण्याचे काम करणारे पोलीस मित्र ,स्वच्छता दूत केशव साळुंखे हे आपली या ठिकाणी सेवा बजावत आहेत.

दरवर्षी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींचा साठा होतो याकरिता यावर्षी ग्रामपंचायतीने मत्स्यपालनासाठी असणाऱ्या छोट्या तराफा बोटी  उपलब्ध करून यामार्फत या बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे या गावचे विद्यमान सरपंच निलम संतोष झांजले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कालपासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्याने या नदीकिनारी चिखल  झाला आहे. वाहने चिखलात फसु नये ,रुतू नये याकरिता विसर्जनासाठी आलेल्या मोठ्या वाहनांधारकानी नदी पात्रात वाहने न आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
पर्यावरणपूरक गणेशोत्सवः महिला सबलीकरणाचा दिला संदेश; राजगड ज्ञानपीठ कॅालेज अॅाफ फार्मसीमधील देखावा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवः महिला सबलीकरणाचा दिला संदेश; राजगड ज्ञानपीठ कॅालेज अॅाफ फार्मसीमधील देखावा

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group