भोर : बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती तालुका वगळता इतर तालुक्यामध्ये तिन पंचवार्षिक सत्ता भोगणारे यांना आता मत पेटून उत्तर देण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी अदलाबदल राजकारणाच्या खेळी अडकल्याना विकासकामाकडे वेळ नाही. यासाठीच मी अपक्ष उमेदवार उभा राहिलो आहे. संधी मिळाल्यास गंरजूवताना न्याय देण्याचा प्रयत्न करील असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले.
कापुरव्होळ (ता.भोर) येथील जय महाराष्ट्र हाॕटेल मध्ये मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पत्रकारपरिषद घेऊन बारामती लोकसभा मतदार संघाच्या विकासकामाची , वंचित कामाची , राजकिय घडामोडी , गडकिल्ले संवर्धन , रस्ते व मलभुत गरजा माहिती प्रा.नामदेवराव जाधव दिली.
बहुतांश भागात पर्यटन वाव असताना , औद्योगीकरण जाणिवपुर्वक कानाडोळा करणे ,पिण्याच्या व शेती पाण्याच्या समस्या , अर्थिक अशिक्षित ठेवणे , मलभुत विकासकामासाठी मागास ठेवणे असे अनेक प्रश्न गेल्या तिन पंचवार्षिक सत्ताभोगीना समजले नाही. विकासकामासाठी माझे व्हिजन मोडेल तयार आहे.
राजकारणात एकमेक पाय ओढत बसलेल्याना जनतेच्या अडचणी समजणे कठिण आहे. पक्ष फोडणे , एकमेकांवर टिकाटिपणी करणे , भावनिक साद घालणे , सत्ता वर्चस्व टिकविण्यासाठी , यांनीआपले जनतेचे करमणूकीचे साधन झाले आहे. मात्र बारामती तालुक्याचा विकास सोडता इतर तालुक्यातील समस्या आज जनतेला भेडसवत असल्यामुळे मी उमेदवारीच्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरलो आहे.
माझा जिवन काळात मी समाज प्रबोधन व पुस्तके लिखाणाद्वारे मराठी माणसांने उद्योगधंद्यात वाहून घेऊन आपला स्वतःचा अर्थिक विकास साधावा यासाठी दोन दशक मी काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्य राज्य कारभार तळागळात पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि करीत राहणार आहे.
,