Thursday, June 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- जारे जारे पावसा तुला देतो पैसा  शेतकऱ्यांची पावसाला आर्त हाक, राजरोसपणे पडणाऱ्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला 

by कुंदन झांजले
October 18, 2024

भुईमूग, सोयाबीन आणि भात काढणीसाठी पावसाची उघडीप आवश्यक

यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून पाऊस उघडण्याचे नावच घेत नाहीये दररोज दिवसा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी,तर रात्रीतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतीची पिके काढणी वाचुन चालली असल्याने शेतकऱ्यांनी आता ” जारे जारे पावसा, तुला देतो पैसा “अशी आर्त हाक पावसाला मारली आहे . 

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मागील काही दिवसापासून वारंवारच्या अवकाळी पावसाने राजरोसपणे हजेरी लावल्याने शेतकरी मात्र पावसाने मेटाकोटीला आला आहे. बऱ्याच लोकांचे अजूनही सोयाबीन काढणे वाचून वाया चालले असून तेच सोयाबीन खाचरात खराब होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. फुले प्रगती , एरंड्या जातीचे भुईमूग काढणीला आले आहेत. पावसाची उघडीप नसल्याने हेच भुईमूग शेतात पुन्हा उगवू लागले आहेत. काही ठिकाणी हळव्या जात्याची भात वाणे काढण्यासाठी आलेली आहेत यामध्ये रत्नागिरी चोवीस ,कोळंबा,रत्ना,शाहिनी,शान, पार्वती,रसिका अशी वेगवेगळ्या जातीची हळवी भाते काढणीसाठी आली आहेत. कधीतरी कडक उन पडत असुन या उन्हात शेतकरी शेतीच्या कामासाठी लगबगीला आला आहे. जादा वारंवारच्या होणा-या पावसाने भात उंचावले असुन आडवे पडले आहे. त्यामुळे आडवे झालेले भात झडुन जात आहे.तालुक्यात इंद्रायणी भाताचा सूवास जरी दरवळत असला तरी या भाताला उन्हाचीही आवश्यकता असुन पावसाने आता पुर्ण उघडिप घ्यावी असे शेतकरी सांगत आहे.

भात बियाणात रातडीचे मोठे प्रमाण, नामांकित कंपनीकडुन पुन्हा बोगस बियाणे                                                        

तालुक्यातील ब-याच शेतक-यांची भात पेरणी, भात लागवड चांगल्या प्रकारे होऊन भातेही टोट-यात दिमाखदारपणे आलीत परंतु भात बाहेर पडताना मात्र भात एकाच जातीचे नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.भात खाचरातुन एक सारखे,एकाच जातीचे भात दिसत नाही . कमी जास्त उंचीचे रातडीचे , वेगवेगळ्या जातीचे भात दिसत आहे. ब-याच नामांकित कंपन्या मार्फत भात बियाणांची खरेदी शेतकऱ्यांनी केली. त्यावेळी दुकानातुन बियाणे देताना दुकानदार बियाणांची स्तुती करत एवढे उत्पन्न निघेल,एक नंबर कंपनीचे, एक नंबर बियाणे आहे हे घ्या असे सांगुन शेक-यांच्या माथी मारले. हे भात पाहून बी बीयाणे खराब,बोगस लागल्याचे शेतकरी दुकानदारास सांगताच दुकानदार मात्र अंगावर न घेता कानाडोळा करीत पुढच्या वेळी दुस-या कंपनीचे बी बीयाणे घ्या असे दरवर्षी सांगत आहे. 

कृषी अधिकारी नावापुरते, ग्रामपंचायत कृषीबाबत शेतीच्या समस्यांबाबत स्तुत

तालुक्यातील ब-याच शेतक-यांना अजुनही तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय कोठे आहे ते माहीत नाही.कोणत्या गावाला कोणता कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषी सेवक,कृषीमित्र आहे गावातील पदाधिकाऱ्यांनादेखील सांगता येत नाही.त्यांची कधी बदली होते, कोणता प्रभारी अधिकारी हे कधीच ग्रामस्तरावर माहीती गत नाही. त्यांची सुधारीत का नावे फोन नंबर ग्रामपंचायत कार्यालयात कधीच उपलब्ध नसतात,मग ते आपल्या शेतीच्या समस्या,बीयाणाबाबत तक्रारी कोणाकडे सांगणार असे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कृषी विभाग फक्त उपक्रमापुरता ,फोटो काढण्यासाठी गावात शेत-यांच्या बांधावर जात असुन या दरवर्षी बोगस बियाणांबाबत मूग गिळून गप्प आहे.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
पुणेः हरवलेले मांजर शोधून देण्याचा केला बहाणा; महिलेचा नंबर घेत केली शरीरसुखाची मागणी, हॅाट्सअपवर पाठवली अश्लिल चित्रफित

पुणेः हरवलेले मांजर शोधून देण्याचा केला बहाणा; महिलेचा नंबर घेत केली शरीरसुखाची मागणी, हॅाट्सअपवर पाठवली अश्लिल चित्रफित

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group