Sunday, June 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पर्यावरणः भीमा नदीतीरी ११०० किलो निर्माल्याचे संकलन; उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले कौतुक

पुणे जिल्ह्यातील सर्व गावांतील युवकांनी पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी पुढे यावेः पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड

by Team Rajgad Publication
September 19, 2024
पर्यावरणः भीमा नदीतीरी ११०० किलो निर्माल्याचे संकलन; उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले कौतुक

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

शिक्रापूरः शेरखान शेख

विठ्ठलवाडी येथील मुख्य चौकात प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या माध्यमातून पांडुरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून भीमा नदीच्या विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे. या  उपक्रमाचे कौतुकास्पद पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले.

येथील भीमा नदीच्या विसर्जन घाटावर विठ्ठलवाडीसह तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कासारी यांसह आदी ठिकाणाहून गणेश भक्तांनी घरगुती तसेच गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन घाटावर केले. यावेळी मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी दिवसभरात एक हजार शंभर किलो निर्माल्य संकलित केले, तर ग्रामस्थांचा हा उपक्रम पाहण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी येथे भेट दिली. तसेच या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.

निर्माल्य संकलनाचा आदर्श पुणे जिल्ह्यातील सर्व गावांतील युवकांनी घेऊन पाण्याचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करावा, असे दिपरतन गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी गवारे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, बाळासाहेब गवारे, दिनेश राऊत, शंकर भुजबळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य सागर ढमढेरे, संदीप गवारे, संभाजी शिंदे, पोलीस पाटील शरद लोखंडे, प्रकाश गवारे, ॲड. संतोष गवारे, दिलीप शेलार, के. टी. कोतवाल यांसह आदी मान्यवर उपस्थित होते‌.

निर्मल्य संकलनासाठी पृथ्वी फाउंडेशनने डजबीन, गणेश भक्तांसाठी संजय गवारे यांनी पिण्याचे पाणी, मुकेश खुडखुडिया, सुधीर ढमढेरे व सुनील ढमढेरे मित्र परिवाराने महाप्रसादची व्यवस्था करण्यात आली होती. तर सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनासाठी जयेश शिंदे यांनी लोकार्पण केलेल्या बोटीतून गणेश आंबेकर, बाळासाहेब गोंडावळे व चंद्रकांत गवारणे यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन केले. निर्माल्य व्यवस्थापनासाठी मेन चौक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Tags: Punerajgadnewsshirur
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

रांजणगावः 'त्या' अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा तब्बल ७ महिन्यांनी लागला शोध; सापळा रचून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group