Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

रांजणगावः ‘त्या’ अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा तब्बल ७ महिन्यांनी लागला शोध; सापळा रचून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

रांजणगावात एका महिलेसह सहा जणांनी युवकाचे केले होते अपहरण

by Team Rajgad Publication
September 19, 2024
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

शिक्रापूर: शेरखान शेख 

रांजणगाव गणपती येथून एका युवकाची पिस्तुलाचा धाक धाकवून अपहरण करण्यात आले होते. तसेच या युवकास मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, तब्बल ७ महिन्यांनी फरार आरोपी प्रवीण वाळके याला पोलिसांनी अटक केली आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून केले होते अपहरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील अजित ढेरंगे या युवकाला १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवीण वाळके सह एक महिला आणि त्याच्या साथीदारांनी चर्चा करण्यासाठी बोलावून पिस्तुलाच्या धाक धाकवून कारमध्ये बसवून दोरीने बांधून निर्जनस्थळी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी या युवकास पिस्तुलाचा धाक दाखवून, कोयत्याने वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत अजित ढेरंगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते.

याबाबत अजित हनुमंत ढेरंगे (वय २३ वर्षे रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहमदनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रवीण वाळके (रा. बाभूळसर), समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे सर्व (रा. भांबर्डे पुणे, हर्षद गोसावी (रा. बाबुरावनगर जि. पुणे व जासूद ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सापळा रचून केली अटक 

या प्रकरणात पोलिसांनी समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे यांसह एका युवकाला अटक केली होती. मात्र प्रवीण वाळके व हर्षद गोसावी फरार झालेले असताना नुकतेच प्रवीण वाळके निमगाव भोगी परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व उमेश कुतवळ यांना मिळाली. त्यांनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रवीन वाळके (वय २१ वर्षे रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे) याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.

Tags: crimenewsPunerajgadnewsranjangaonshirur
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
धक्कादायकः बारामतीमधील दोन अल्पवयीन मुलींना मित्राच्या खोलीवर नेले; दारु पाजत केला सामूहिक अत्याचार

विकृतीचा कळसः विवाहितेच्या घरात घुसून हात, पाय ओढणीने बांधून केला अत्याचार; मीरा भाईंदरमधील संतापजनक घटना

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group