भोरः प्रतिनिधी कुंदन झांजले
भोर ते महुडे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यांची बुजवणी केली जात असली तरी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी, रोजगारासाठी जाणारे नागरिक आणि रात्रपाळीला कामाला जाणारे अनेकजण प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. या प्रश्नावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. अशा प्रकारची अत्यंत दुर्लक्ष करण्याजोगी स्थिती निर्माण झाल्यास अपघाताची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशा प्रकारची रस्त्याची तातपुरती मलमपट्टटी करण्यापेक्षा रस्त्याचे कायमस्वरूपी दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सध्याची दुरुस्ती काही दिवसांनी पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत आहे. असे मत या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे आहे. यामुळे भोर-महुडे मार्गावरील खड्ड्यांच्या साम्राच्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जबाबदार कोण ?
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोण करत आहे आणि या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरील अपघातांसाठी कोण जबाबदार असणार, असा देखील प्रश्न विचारला जात आहे.
नागरिकांची मागणी
या रस्त्यावरील खड्डे त्वरित आणि कायमस्वरूपी बुजवण्याची मागणी नागरिक करत आहेत. यासाठी, उच्च दर्जाचे मटेरियल वापरणे आवश्यक आहे. तसेच, या रस्त्याची नियमितपणे दुरुस्ती करण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडे अपेक्षा
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.