५०० कुटुंबांना ५०० लिटर पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप
भोर तालुक्यात दुर्गम भागात अनेक वेळा लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते यावेळी पाणी साठवण करण्यासाठी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन कारी (ता.भोर) येथील ५०० कुटुंबांना ५०० लिटरच्या सिन्टेक्स साठवण टाक्याचे सीएसआर फंडातुन मोफत वाटप करण्यात आले. कारी गावातील मागले आवाड, सुतार आवाड, घोलप आवाड चौका, जांभुळवाडी, दलितवस्ती, शिव, तुपेवस्ती या ठिकाणी पाणी साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत बेलगांवर, अशोक जेधे, विरुपक्षप्पा, सतीश हेगडे ,रेणीता काकाणी , या गावचे सरपंच सतिश ढेबे, उपसरपंच गणेश जेधे, उद्योजक नामदेव जेधे, माजी सरपंच राजेंद्र घोलप, संपत घोलप, अजित चिकणे, रामचंद्र जेधे, शिवाजी कंक, संजय जेधे, विठठल जेधे, आविनाश गायकवाड, अमर बुदगुडे, विशाल खोपडे , रघुनाथ पारठे, नितिन कुडले, बाजीराव घोलप, दत्ताञय जेधे, विजय शेडगे, गणेश कोंढाळकर, बाजीराव जेधे, सुरेश जेधे, वाघु जेधे, तानाजी पवार असे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड ही कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. जी बियाण्यांच्या संशोधन, विकास आणि वितरणामध्ये विशेष आहे. ६० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय असुन ॲडव्हांटाची तांदूळ मका, सूर्यफूल, भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, भेंडी, मिरची, वाटाणा, फुलकोबी इत्यादी उत्पादने जगभरात आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप अमेरिका देशात विकली जातात. कंपनीच्या सीआरएस फंडातुन कारी येथील ५०० कुटुंबांना प्रत्येकी ५०० लिटर साठवण टाक्यांचे मोफत वाटप करण्यात आले असे उपसरपंच गणेश जेधे यांनी सांगितले उन्हाळ्यात लोकांना पिण्याच्या पाण्याची साठवण करण्यासाठी कंपनीकडुन मोफत टाक्या वाटप करण्यात आल्या आहेत. सरपंच सतिष ढेबे म्हणाले ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन आमच्या लोकांना पाणी साठवण टाक्या मिळाल्याने दर उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी होणारी अडचण दुर होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्हांटा कंपनीच्या अधिका-यांचे आभार मानण्यात आले.
कारी हे रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्यासी असुन सरदार कान्होजी जेधे यांचे मुळगाव असुन या गावात ऐतिहासिक वाडा आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची टंचाई पाहता या गावात पाण्याची साठवण टाक्यांची गरज ओळखुन ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने गावातील ५०० कुटुंबाला पाण्याच्या टाक्या वाटप केल्या असुन भविष्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पिठ गिरणी व शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. तर सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका गावाला देण्यात येणार असल्याचे कंपनीकडुन सांगितले. सुञसंचलन शिवाजी कंक यांनी केले .