जेजुरीः येथील विद्यानगर परिसरामध्ये शहरातील लाभार्थी महिलांना गृहउपयोगी साहित्याचे तसेच विश्वकर्मा योजन्याच्या प्रमाणपत्राचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले.
सदर घरेलू कामगार गृहउपयोगी वस्तू ही शासनाची योजना असून, पुणे जिल्ह्याच्या महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहल दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले, तालुका महिला अध्यक्ष मंगल पवार, महिला मोर्चा अध्यक्षा उमा खुंटे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आली.
लाभार्थी महिलांना गृहउपयोगी साहित्याचा संच व विश्वकर्मा लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप पुरंदर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव व पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहल दगडे यांच्या हस्ते करण्यात आले. गृहउपयोगी संचामध्ये कुकर, पिण्याचा पाण्याचा पिंप, ताट, वाट्या अशा २९ वस्तू आहेत. एकूण ८० महिलांना या संचाचे वाटप करण्यात आले. स्नेहल दगडे यांचे सहकारी उत्तमराव कांबळे यांचे विशेष योगदान यासाठी लाभले.
या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास बाबाराजे जाधवराव पुरंदर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख, पुणे जिल्हा महिला मोर्चा प्रमुख स्नेहल दगडे, तालुका अध्यक्ष निलेश जगताप, प्रदेश सचिव श्रीकांत ताम्हाणे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दिलीप कटके, तालुका महिला अध्यक्ष मंगल पवार, पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन पेशवे, जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले, उपाध्यक्ष शिवाजी बारसुदे, दशरथ उबाळे, रविंद्र कोशे, सरचिटणीस विक्रम माळवदकर, कल्पेश सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्ष उमा खुंटे, महिला सरचिटणीस अर्चना पोकळे, जेजुरी उद्योग आघाडी अध्यक्ष सचिन मोरे, कामगार अध्यक्ष सचिन कापडे यांच्या उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि खोमणे यांनी केले, तर आभार सचिन मोरे यांनी मानले.