भोर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर येथील रुग्णांना आरोग्यदायी फळांचे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. तसेच वनवासी कल्याण आश्रम येथील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किट खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा भाजपाचे चिटणीस सचिन मांडके ,पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस पंकज खुर्द, भोर शहर सरचिटणीस ॲड कपिल दुसंगे, पुणे जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्या स्वाती गांधी, गीता शिंदे, मनीषा राजीवडे, विशाल दुसंगे, केदार साळुंखे , बच्चुभाई आतार, दिलावर पटेल, शंकर भालेराव, लता आंबडकर ,अमोल भाले, सुरेश कांबळे व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वनवासी कल्याण आश्रमातील शिक्षक उपस्थित होते