माहिती देण्याचे भोर पोलिसांचे आवाहन
भोर – महाड मार्गावर शहरापासून हाकेच्या अंतरावर मांगीरचा ओढा परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी याबाबत भोर पोलिसांना खबर दिली आहे.अंदाजे 35 ते 40 वर्षाचा पुरुष जातीचा मृतदेह असून अंगात मळकटलेली निळसर रंगाची पॅन्ट, राखाडी रंगाचा त्यावर पिवळसर रंगाची पट्टी असलेला गोल गळ्याचा टी-शर्ट असून हातात रबरी बँडसह चांदीच्या रंगाचे कडे आढळून आले आहे.अंदाजे साडे पाच फूट उंची ,रंग काळा सावळा ,कुरळे केस ,पुढील बाजूस टक्कल असून सदर इसमाबाबत माहिती असल्यास भोर पोलिसांना (02113/222533) कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आण्णा पवार ,उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी केले आहे.