भोर -राजगड- मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकारातून बुधवार (दि. १९) शिवजयंतीचे औचित्य साधुन किल्ले रायरेश्वर पठारावर (ता.भोर) येथे ४० फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात शपथ घेतली होती.आज त्याच पवित्र भूमीत उभारलेला भगवा ध्वज स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो. याच तालुक्यातील बारा मावळ प्रांतातील मावळ्यांच्या साथीने स्वराज्य तोरण उभारण्याची शपथ महाराजांनी या रायरेश्वरावर घेतली होती. हा सोहळा घडवून आणण्याचा सन्मान व ध्वज उभारण्याचे परम भाग्य मला मिळाल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले. ध्वज उभारण्यासाठी घनगड प्रतिष्ठान मुळशी यांचे सहकार्य लाभल्याचे मांडेकर म्हणाले. यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे , जि,प.माजी सदस्य चंद्रकांत बाठे , उद्योजक यशवंत डाळ , अविनाश गायकवाड, केदार देशपांडे, अतुल काकडे, समीर घोडेकर, सचिन देशमुख तसेच भोर -राजगड- मुळशी तालुक्यातील शिवभक्त तरुण-तरुणी ,हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.