भोरः भोर विधानसभेचा निकाल धक्कादायक लागला असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी विजयाचा गुलाल आपल्या माथी लावत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाची धूळ चारली आहे. आज दि. २३ नोव्हेंबर रोजी भोर विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली. मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम टिकवून ठेवल्याने त्यांनी विजय संपादित केला आहे. यामुळे आता १५ वर्ष या मतदार संघावर संग्राम थोपटे यांच्या वर्चस्वावर मांडेकर यांनी सुरूंग लावत विजय आपल्या नावे केला आहे. परिणामी थोपटे यांचा विजयाचा चौकार हुकला आहे. मांडेकर समर्थकांकडून मोठ्या घोषणात देत विजयाच्या गुलाल उधळण्यात आला आहे. मांडेकर हे १९ हजार ७०० मतांनी विजयी झाले आहेत.