निरादेवघर धरण प्रकल्पामतील अनेक कामे प्रगतीपथावर
भोर राजगड (वेल्हे) तालुक्यातील निरादेवघर, भाटघर, चापेट, गुंजवणी हे धरण प्रकल्प भोर तालुक्यासह पूर्व भागातील बारामती , इंदापूर ,फलटण ,माळशिरस पर्यंतच्या शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरत असल्याचे निरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील कोंडुलकर यांनी सांगितले.
भोर -राजगड(वेल्हे) तालुक्यामध्ये असलेल्या भाटघर नीरादेवघर आणि चापेट गुंजवणी या धरण प्रकल्पांमध्ये एकूण ३६ टीएमसी पाणीसाठा क्षमता असुन. यातील नीरा देवघर प्रकल्पातील उजवा आणि डावा कालव्याचे काम पारंपारिक उघड्या पद्धतीने पूर्ण झाले आहे. व त्यातुन सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जात आहे. तसेच त्यापुढील कि.मी. ६६ ते ८७ मधील कामे बंदनलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातुन प्रगतीपथावर आहेत. त्यांतर्गत रेल्वे क्रॉसिंगचेही महत्वाचे काम सुरु आहे. खंडाळा व फलटण तालुक्यातील एकूण ६३६६ हे. क्षेत्रास जून २०२७ अखेरपर्यंत सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गावडेवाडी, शेखमिरवाडी, वायोशी या तीन उपसासिंचन योजना खंडाळा तालुक्यात असून या तीन उपसासिंचन योजनेची कामे प्रगतीपथावर असून मंजूर अहवालानुसार सदर प्रकल्प माहे मार्च २०२७ अखेरपर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.
गुंजवणी प्रकल्पाच्या बंद नलिका कालव्याच्या कामाला वेग आलेला असुन भोर व वेल्हे तालुक्यातील वाजेघर खोरे, वांगणी खोरे व शिवगंगा खोरे अशा उपसासिंचन योजनांचा समावेश करून, गुंजवणी प्रकल्पाचा तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समिती, पुणे यांना सादर करण्यात आलेला आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समिती, पुणे यांचेकडून तपासणी पूर्ण करून लवकरच प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येणार आहे, कमी मणुष्यबळात सर्व कामे विहीत कालावधीत गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व कर्मचारी व कार्यकारी अभियंता हे महत्वाची भूमिका बजावत आहेत.