भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गणेशमूर्तींच्या किंमतीमध्ये देखील 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे येथील मूर्तीकारांनी सांगितले.
बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात डेकोरेशन आणि सजावटी सुरु करण्यास सुरुवात झालेली आहे. बाप्पाच्या आसनाची व्यवस्था कशी करायची, कोणते डेकोरेशन करायचे, तसेच बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवायचा याची देखील तयारी सुरु आहे. पुण्यातील गणेश मूर्तींची आरस किंवा सजावट पाहण्यासाठी भक्तांची मांदियाळी पुण्यात दाखल होत असते. यामुळे या काळात बाप्पाच्या भक्तीमध्ये सारे जण लीन झालेले असतात.