ह.भ.प.राजेंद्र शास्त्री महाराज व न्यायाधीश नेहा नागरगोजे यांनी दिली मराठी भाषेची माहिती
भोर – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकील संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर, भोर येथे मराठी भाषा संवर्धन निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी व्याख्याते राजा रघुनाथ विद्यालयाचे प्रा. ह.भ. प. राजेंद्र शास्त्री उपस्थित होते. शास्त्री यांनी मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे सांगून मराठी भाषेचा उदय कसा झाला, मराठी भाषेचा इतिहास याबाबत विस्तृत प्रमाणात माहिती दिली. तसेच भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश नेहा नागरगोजे न्यायालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेचा वापर होत असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्यामुळे मराठी भाषा संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोर वकील संघटनेच्या सचिवा मनीषा तारू यांनी केले. प्रास्ताविक भोर वकिल संघटनेचे खजिनदार जगन्नाथ चिव्हे यांनी केले व आभार प्रदर्शन विजय दामगुडे यांनी केले.
यावेळी सदर कार्यक्रमास भोर वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड शिवाजी पांगारे, सोपान कोंढाळकर, त्रिंबकराव देशमुख, शिवाजी मरळ, राजश्री बोरगे, प्रकाश लाड, सुरेश शिंदे, राजेंद्र खोपडे, विश्वनाथ रोमण, मयुर धुमाळ, अजिंक्य मुकादम, दत्तात्रय ऊरूणकर, उदय कोंढाळकर, यशवंत शिंदे, सचिन बागल, राकेश कोंडे, संजय कोचळे, गणेश डिंबळे, धीरज चव्हाण, साहिल मुकादम आदी वकील उपस्थीत होते. तसेच सदर कार्यक्रमास दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक नामदेव बोत्रे व सर्व न्यायालयीन कर्मचारीदेखील उपस्थीत होते.