भोर – कर्नाटक रायचूर येथून बेडगी व साधी लाल मिरची थेट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात विक्रीस आणली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या बाजारा पेक्षा कमी किंमत असल्याने तालुक्यासह परिसरातील ग्राहकांकडून या मसाला मिरचीला पसंती मिळत असली तरी स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून आली कर्नाटक मिर्ची खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडत आहे. तर विक्री होत असलेल्या मिर्ची मुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायचूर कर्नाटक भागातील लाल मिरची प्रथमच थेट शेतकऱ्यांकडून एवढ्या लांब महाराष्ट्रात विक्रीसाठी आली आहे. रस्त्यालगत या मिरचीची विक्री सुरू आहे बेडगी व साधी लाल मिरची या दोन्हींचा किलोला दोनशे ते अडीचशे रुपये भाव असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक ही मिरची खरेदी करत आहेत.शेतकरी कुटुंब कर्नाटक येथून छोट्या – मोठया टेम्पोमधून मिरचीची मोठे भोत भरून आणून या भागात विक्री करत आहेत.
बाजारा पेक्षा कमी किंमत
उन्हाळा सुरू होण्याच्या काळात ग्रामीण भागात घरात स्वयंपाकासाठी लागणारा मसाला तयार करतात त्यासाठी आवश्यक असलेली मिरची फेब्रुवारी ते एप्रिल – मेपर्यंत मोठ्या प्रमाणात विक्री होते. स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील दुकानात मोठ्या प्रमाणात मिरचीचा साठा भरला आहे. परंतु त्यांच्याकडेची मिरची व किंमत वेगळी आहे. यापेक्षा कर्नाटक येथून आणलेली मिरची अधिक चांगली किंमत देखील कमी आहे. यामुळे कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी आणलेली मिरची हातोहात विकली जात आहे.