मांजरी खुर्द : विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, यांनी गणेश उत्सवानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडु नये व पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणात साजरा होणारा गणेश उत्सव हा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करणेबाबत आदेशित केले होते.त्याअनुषंगाने वरील अधिकारी व अंमलदार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक स्वप्नील जाधव व पोलीस शिपाई दत्ता गावडे यांना त्यांचे गोपनीय खब-यामार्फत बातमी मिळाली की, मांजरी खुर्द स्मशानभुमी समोर एक इसम उभा असुन त्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे.
त्वरित पोलीस शिपाई गावडे यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना फोनद्वारे दिली असता सपोनि गजानन जाधव यांनी सदरची बातमी विश्वजीत काइंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
त्वरित सपोनि गजानन जाधव व वरील पोलीस अंमलदार यांनी मांजरी खुर्द स्मशानभुमी या ठिकाणी यशस्वी सापळा लावुन मिळालेल्या बातमीची खातरजमा करुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत कारतूस मिळुन आल्याने त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्हयाचा पुढील अधिक तपास बाळासाहेब सकाटे, सहाय्यक पोलीसफौजदार, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहे.