नसरापूर : पहिलवान हुशार असतो तो कुठेही कमी नसतो. बारा वर्ष तापानंतर कठोर परिश्रम करून पहिलवान घडतो. पहिलवान होण्यासाठी शारीरिक कष्टाबरोबर बौद्धिक डावपेच खेळता येणे खूप गरजेचं आहे. आपले शरीर सुधृढ ठेऊन, व्यसनाधीनतेपासून लांब राहून निंदा करणाऱ्याकडे लक्ष देऊ नका असे मत महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांनी शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मांडले. कार्यक्रमाची सुरुवात अभिजित कटके, अभिनेत्री अपूर्वा सपकाळ, संस्थेचे उपसचिव एल.एम.पवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे, वस्ताद तानाजी काशीद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे इ. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलालाने करण्यात आली.
प्रास्ताविक करीत असताना प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी महाविद्यालयाचा वर्षभरातील कार्यक्रमांचा, झालेल्या विकास कामांचा आढावा घेऊन महाविद्यालय यशस्वितेकडे कशी वाटचाल करीत आहे हे अधोरेखित केले.तुम्हाला जे मनापासून वाटते ते करा. महाविद्यालय जीवन हा उन्नतीचा सर्वात मोठा सुवर्णकाळ असतो. एन्जॉय करण्याची तुमची स्वतःची व्याख्या तयार करा. विधायक कार्य करण्यासाठी कोणतेतरी एक धेय्य ठरवून आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा. तसेच वाचन महत्वाचे असून वाचनामुळे व्यक्ती समृद्ध होऊन जीवन आनंदमय होते असे मत प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा सपकाळ यांनी व्यक्त केले.
कुस्तीचे वस्ताद तानाजी काशीद यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना आजचा आपला हा दिवस जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारा दिवस असून आई-वडील आणि गुरुजनांच्या संस्कारामध्ये तसेच आशीर्वाद घेऊन जीवनात नक्कीच यशस्वी होता येते असे मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोडे यांनी श्रेयस आणि प्रेयस महत्वाचे आहेत असे सांगून वडिलांची आपल्या लेकराप्रतीची उमेद निर्माण करणारी उपस्थितांसमोर कविता सादर केली.कष्ट आणि जिद्द असल्यावर यश आपल्या जवळ येते. पराजयामध्येही यश शोधता आले पाहिजे. कधीही दुसऱ्यांशी तुलना करू नये असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेचे उपसचिव एल.एम.पवार यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी नसरापूर गावच्या सरपंच सपनाताई झोरे,उपसरपंच अनिल वाल्हेकर, निसर्गराजा मित्र जीवांचे फाउंडेशनचे राहुल घोलप, माणिक धर्माधिकारी महाविद्यालयातील डॉ.संगीत घोडके, डॉ.हिमालय सकट, प्रा.सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, प्रा.जीवन गायकवाड, डॉ.सचिन घाडगे, प्रा.संदीप लांडगे, प्रा.प्रल्हाद ननावरे,प्रा.दयानंद जाधवर, प्रा.वर्षा तनपुरे, प्रा.कोमल पोमण, प्रा.महेश कोळपे, प्रा.माउली कोंडे, प्रा.ऋतुजा साळुंके, प्रा.ऐश्वर्या धुमाळ कार्यालयातील विकास ताकवले, आशिष परमार, महेश दळवी, मनीषा मोहिते, राणी धनावडे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे, माजी विद्यार्थी संघातील आप्पा सावंत, सचिव विजय थिटे इ.तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.