Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विशेष अधिकाराचा वापर करीत मुख्यमंत्र्याविरोधात अवमान भंगाची विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार

आमदार संजय जगताप यांची पत्रकार परिषदेतून राज्य, केंद्र सरकारवर सडकून टीका

by SBPRNL
July 26, 2024

पुरंदर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखरित्याखाली बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची आमसभा होती. त्यामुळे ही बैठक नंतर घेण्यात यावी, याचे कारण म्हणजे त्याच दिवशी आमसभा असल्याने विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो, अशी विनंती जगताप यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली होती. तरी देखील बैठक घेण्यात आली असल्याचे जगताप यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी जगताप यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुध्द विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना केली आहे. याबाबतची माहिती आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी “जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवले त्याच्यासाठी बैठक घेतली”, असल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या दिवशी आमसभा होती. त्या दिवशी मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी फोनद्वारे बोलणे झाले होते. तसेच इमेल करुन ही बैठक नंतर घेण्यात यावी, अशी विनंती देखील पत्रव्यवहार व इमेलद्वारे करण्यात आली होती. असे जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याविरुध्द महाराष्ट्र विधानसभा नियम २७४ अन्वये विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. या विशेष अधिकाराचे संरक्षण करणे अध्यक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीमुळे आमसभेच्या बैठकीला अनेक अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

अनेक योजना अजूनही प्रलंबित आहेत. त्यावर “सही करायला मुख्यमंत्र्याना वेळ नाही का”? असा सवाल करीत राज्यातील सरकार यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, केवळ फार्स करीत आहे. सरकारकडून विकास कामांसाठी लागणारा निधीची तरतूद झाली पण निधी अजूनही वर्ग करण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. जेथे गरज नसताना काहींच्या सांगण्यावरुन निधी दिला जात आहे. हा एकप्रकारचा दुजा भाव नाही का, असे म्हणत राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर अनेक प्रश्नांचा पाढा वाचत आमदार संजय जगताप यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टिकास्त्र डागले. यामुळे आता पुरंदर  विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची अगामी काळात सोडवणूक होईल का? हे येणारा काळाच सांगेल.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
Next Post

शिंद येथील सुपुत्र कालिदास भालेघरे देशासाठी शहीद  

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group