राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 14 hours ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 14 hours ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 2 days ago
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ 2 weeks ago
शिरवळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ; नितीन भरगुडे-पाटील भाजपच्या गळाला, मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना जबरदस्त धक्का 2 weeks ago
Next
Prev
Home News

चौकशीच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?

पोलिसांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?

by Team Rajgad Publication
February 18, 2025
चौकशीच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?
0
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिरवळ पोलिस ठाण्यातील मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या; कुटुंबीय आक्रमक

शिरवळ (ता. खंडाळा) – भोर तालुक्यातील न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय २२, रा. न्हावी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मारहाण करणारे पोलीस कोण होते, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे.

You might also like

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

घटना कशी घडली?  शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान निर्घृण हत्येत झाले. बुधवारी रात्री ११:३० वाजता एका कंपनीच्या गेटजवळ अमर शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) याची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय १९, रा. गुणंद, ता. भोर) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संदीप जगताप करत आहेत.

चौकशीच्या नावाखाली अमानुष मारहाण या हत्येच्या चौकशीदरम्यान, आरोपीसोबत कंपनीत काम करणाऱ्या इतर तरुणांची देखील चौकशी केली जात होती. त्यात अजय तुकाराम शिंदे यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी (दि. १७) अजय आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत जबर मारहाण केली. या मारहाणीत तपासी अधिकाऱ्यांसह दोन पोलिस हवालदार आणि एक पोलिस शिपाई सामील असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मारहाणीमुळे अजयच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्याचे हात-पाय सुजले होते आणि पोलिसांनी कोणत्या प्रकारे मारहाण केली, हे देखील अजयने कुटुंबियांना सांगितले होते. या भीतीमुळे अजयने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप या घटनेनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून, पोलिसांच्या मारहाणीमुळेच अजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जर आमचा मुलगा दोषी होता तर त्याला अटक करायला हवे होते. चौकशीसाठी बोलावून त्याला अमानुष मारहाण का केली?” असा सवाल कुटुंबीय विचारत आहेत. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पोलिसांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार? या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेणार, दोषी पोलिसांवर कठोर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कुटुंबीय व ग्रामस्थांनी न्यायाच्या प्रतीक्षेत असून, याबाबत आता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय निर्णय घेतला जातो, हे लवकरच स्पष्ट होईल.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड
भोर

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा
भोर

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ
भोर

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

February 1, 2026
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

January 22, 2026
शिरवळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ; नितीन भरगुडे-पाटील भाजपच्या गळाला, मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना जबरदस्त धक्का
ताज्या बातम्या

शिरवळ जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलथापालथ; नितीन भरगुडे-पाटील भाजपच्या गळाला, मंत्री मकरंद (आबा) पाटील यांना जबरदस्त धक्का

January 21, 2026
ब्रेकिंग न्यूज: भोर तालुक्यात भाजप–शिवसेना युतीची चर्चा रंगात; विकासासाठी की राजकीय अस्तित्वासाठी एकत्र?
ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज: भोर तालुक्यात भाजप–शिवसेना युतीची चर्चा रंगात; विकासासाठी की राजकीय अस्तित्वासाठी एकत्र?

January 21, 2026

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

February 1, 2026
राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

January 22, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live