Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात पुणे जिल्ह्यात उत्रौली जि.प. शाळेचा द्वितीय क्रमांक

by कुंदन झांजले
October 19, 2024

उत्रौली शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, शिक्षकांच्या कषटाचे चिज ,गावक-यांकडु कौतुक.

भोर – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली गावच्या आदर्श शाळेने पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा “ या अभियानात पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून उत्रौली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२४- २५ मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले. या अभियानात सहभागी झालेल्या शाळांना विविध उपक्रमातून  गुणांकन देण्यात आले होते. यात विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व परिसराचे सौंदर्य, शाळेची इमारत, संरक्षित भिंत, वर्ग बोलक्या भिंतींची उभारणी, विद्यार्थी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, परसबाग,अमृतवाटिका यांची निर्मिती,मेरी माटी मेरा देश उपक्रम, विद्यार्थ्यांनी चालवलेली बचत बँक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, महावाचन चळवळ, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छता मॉनिटर अभियान, राष्ट्रीय एकात्मता संदर्भात विविध उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आदींचा यात समावेश होता. याचबरोबर व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग,यामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी,विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता कौशल्य विकास यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, दानशूर व्यक्ती संस्था यांच्याकडून मिळालेल्या वस्तू व सेवा स्वरूपातील देणगी, शाळा व्यवस्थापन समितीने उत्तम पार पाडलेले कामकाज, तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त शाळा, माजी विद्यार्थी पालक सेवाभावी संस्था यांचा अधिकाधिक सहभाग व योगदान, अशा विविध मुद्द्यांवर व निकषानुसार गुणांकन करून विजयी स्पर्धक शाळांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. यामध्ये आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली शाळा सरस कामगिरीच्या जोरावर संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

उत्रौली शाळेला प्रेरणा देणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, भोर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे , उत्रौली केंद्राचे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यपिका चोरघे सविता,‌संगीता पापळ, अनिता सुतार, वैशाली चिंचकर, अनिता लोखंडे, विठ्ठल दानवले, अश्विनी पवार, अमर उभे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य , त्यांना बहुमूल्य सहकार्य करणारे ग्रामस्थ, तरुण मंडळ व सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वक्तृत्व, लेझीम, विज्ञान प्रदर्शन, लोकनृत्य, चित्रकला, भजन , प्रश्नमंजुषा या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवणारी उत्रौली शाळा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रथम क्रमांकाच्या अध्यक्षा चषकाची यापूर्वीच मानकरी ठरलेली आहे.शाळेत छंद वर्ग, रांगोळी, नाटक, विणकाम, शिवणकाम, नृत्य, वादन चित्रकला,ओरिगामी इत्यादी उपक्रमातून मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत. प्रत्येकाला प्रेरणा देणारी उत्रौली शाळा इतरांपेक्षा वेगळी यासाठी ठरते की जिल्हा परिषदेची शाळा असूनही गुणवत्तेच्या ,भौतिक सुविधांच्या बाबतीत खाजगी शाळांपेक्षा ती कुठेही कमी नाही त्यामुळेच या शाळेत भोर शहर व आजूबाजूच्या परिसरातून अनेक विद्यार्थी  दाखल होत आहेत असे या शाळेचे शिक्षक विठ्ठल दानवले यांनी सांगितले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सारोळा गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात ; जीवितहानी नाही

सारोळा गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात ; जीवितहानी नाही

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group