खंडोबा चरणी नतमस्तक होऊन भक्तांची आराधना
मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी ही तिथी श्री खंडोबा देवाची चंपाषष्ठी उत्सव म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा असल्याने भोर तालुक्यातील गावागावातील घरातील कुटुंबातून हाच चंपाषष्ठी उत्सव मार्तंड खंडोबा देवाची, तळई भरून ,नैवेद्य , आरती करून मोठ्या उत्साहात आज साजरा केला आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मार्तंड खंडोबा असून मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंत देवाचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची सांगता सहाव्या म्हणजे षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी केली. देवकाळात मनी आणि मल्ल या दोन दैत्य राक्षसांनी हाहाकार माजवला होता त्यावेळी श्री खंडोबा देवाने लोकांचे रक्षण करीत या दानवांपासून लोकांना संकट मुक्त करून त्या दानवांचा पराभव करून लोकांचे रक्षण केले या गोष्टींचे स्मरण म्हणून हा चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे यावेळी देवाला बाजरीची भाकरी ,वांग्याचे भरीत लोकांना एकत्र घेऊन नैवेद्य दाखवला जातो व देवाची आरती करून सहा दिवसाच्या नवरात्रीची सांगता केली गेली अशा प्रकारे हा चंपाषष्ठी उत्सव ग्रामीण भागात गावागावात साजरा केला गेला असे मार्तंड देवाचे खंडेरायाचे भक्त बसरापुर गावचे उपसरपंच रामदास झांजले यांनी सांगितले.