शिरवळ : विंग ता खंडाळा येथील गुठाळे गावातील शेतात एका तरुणीचा अस्थिपंजर सांगाडा आढळून आला. ही घटना शनिवारी (दि.१६) उघडकीस आली. दरम्यान माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा सांगाडा घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. सांगाड्याजवळील कपड्यांवरून संबंधित सांगाडा महिलेचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. घटनास्थळी पोलिसांना महिलेचे कपडे बॅग मिळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गुठाळे ता. खंडाळा या ठिकाणी हा सांगाडा मिळाला आहे. शनिवारी या काही व्यक्ती गावतील डोंगराकडे गेले असता , त्यावेळी त्यांना हा सांगाडा दिसला. त्यांनी याबाबत शेताच्या मालकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या सांगाड्याची ओळख पटली असून सदर महिलेचा खून की अजून काही याची चर्चा मात्र परिसरात रंगली आहे . सदर तरुणी ही मागील काही दिवसा पासून बेपत्ता असल्याचे देखील नातेवाईकांनी सागितले. सदर महिला परराज्यातील असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
सदर घटनेचे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.