सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे साठी करण्यात आले तडीपार
सातारा जिल्ह्यातून १०५ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले
शिरवळ : सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील 4 सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे. यासह, नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत 105 गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक आणि संजय विजय कोळी यांचा समावेश असलेली ही टोळी शिरवळ परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी चोरी, गंभीर दुखापत पोहोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे करत होती.या टोळीमुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता.
या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाण्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला होता.हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी या प्रस्तावाची चौकशी करून या टोळीतील 4 सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.
हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाण्याचे पो. हवा सचिन वीर आणि पोकों मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
तर सदरील प्रस्ताव तत्कालीन पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी पाठवत विद्यमान पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांनी पाठपुरावा केला आहे..!
इतर कारवाई
नोव्हेंबर 2022 पासून आत्तापर्यंत 24 उपद्रवी टोळ्यांमधील 79 इसमांना, मपोकाक 56 प्रमाणे 24 इसमांना आणि मपोकाक 57 प्रमाणे 2 इसमांना असे एकूण 105 इसमांविरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे.
कडक कारवाया करण्यात येणार
भविष्यातही आगामी लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.