एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण जखमी भोर शहराशेजारील दुर्दैवी घटना
भोर– महाड महामार्गावरील वेनवडी ता.भोर येथील गावाजवळ महांगीरीच्या ओढ्यात बुधवार दि.१० सकाळी आठच्या दरम्यान टेम्पोने -दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेत वेनवडी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भोरवरून महाडकडे तरकारी भरून भरधाव वेगात जाणारा छोटा हत्ती टेम्पो (एमएच ६ बी डब्ल्यू ८०५६ )याने वेनवडी बाजूकडून येणाऱ्या दुचाकी गाडीवरील दोन तरुणांना समोरून जोरदार ठोकर दिली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की,या घटनेत दुचाकीवरील दोघांनाही टेम्पोने काही अंतर फरपटत नेल्याने वेनवडी येथील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमी तरुणास भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत तरुण मेकॅनिकल इंजिनियर असून भोर तालुक्यातील एक इंजिनियर अपघातात गेल्याने गावातील तरुणांकडून व आजुबाजूच्या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.