राजगड न्युज -कुंदन झांजले
भोर : तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक असून तालुक्याला भात पिकाचे आगार संबोधले जाते.या भात पिकासाठी तालुक्यात उपयुक्त हवामान असल्याने भाताचे उत्पादन दरवर्षी वाढताना दिसत आहे.यामध्ये इंद्रायणी हे भात वाण अधिक आहे. बहुदा इंद्रायणी म्हटले की भोर तालुका असे म्हटले जाते .या भात पिकावर वर्षभराची आर्थिक उलाढाल होत असुन घर कुटुंब खर्च चालण्यास या भात उत्पन्नाची मदत होत असते. मात्र भोर तालुक्यातील नांदगावच्या ८ शेतकऱ्यांना आनेवाडीतील भात व्यापा-याने पैशांचा गंडा घालीत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले
पुर्वी शेतकरी भात पीक मळून झाल्यानंतर भात भरडून तांदूळ तयार करून या तांदळाची मोठी विक्री करत असे. मात्र सध्या अलीकडील काळात शेतकरी वर्ग भाताची भरडणी न करता भात विक्री करीत आहेत. कारण यामध्ये तांदळापेक्षा फक्त भाताला चांगला भाव मिळत आहे हे शेतकऱ्यांना परवडत आहे असे ते सांगत आहेत. याच दरम्यान या पार्श्वभूमीवर नांदगाव ता.भोर येथील शेतकरी हनुमंत पर्वती कुडले आणि इतर ७ शेतकरी यांनी शेतात पिकवलेले इंद्रायणी जातीचे भात स्थानिक दलालाद्वारे मु.आनेवाडी ता.जावली जि. सातारा येथील भात व्यापारी निलेश रवींद्र फरांदे यांना विक्री केले. या व्यापाऱ्याने भात ताब्यात घेताना शेतकऱ्यांना काही रोख रक्कम व उर्वरित रक्कमेचा पुढील काही चार दिवसांचा चेक दिला होता.
परंतु दीड महिना उलटून गेला तरी व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना दिलेले उर्वरित रकमेचे चेक बँकेत वठले गेले नाही शेतकरी बॅंकेत चकरा मारून वैतागून जाऊन आमची शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या फसव्या चेकबाबत वकिलांकडे धाव घेतली असता वकिलांनी संबंधित व्यापाऱ्याला नोटीस बजावली असता सदर पत्त्यावर व्यापारी राहत नसल्याचे नोटीस परत आल्याने दिसले आहे. तसेच त्या वयापा-याचा दूरध्वनी बंद असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. अशीच घटना वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी गावात घडली असून भोर तालुक्यातील सोयाबीन व्यापाऱ्याने आठ ते दहा शेतकऱ्यांना फसवल्याचेदेखील समोर आले आहे. शेतकऱ्याने वर्षभर काबाडकष्ट करून ,घाम गाळून, आर्थिक तोटा सहन करून ,सालभराच मोलाचं पीक घ्यायचं आणि नंतर अचानक अशा फसव्या घटनेंना सामोरे जायचं या घटनेने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी भोर तालुक्यात सक्रिय असून या फसव्या व्यापाऱ्यांना कोण आवर घालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शेतकऱ्याने वर्षभर काबाडकष्ट करून ,घाम गाळून, आर्थिक तोटा सहन करून ,सालभराच मोलाचं पीक घ्यायचं आणि नंतर अचानक अशा फसव्या घटनेंना सामोरे जायचं या घटनेने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी भोर तालुक्यात सक्रिय असून या फसव्या व्यापाऱ्यांना कोण आवर घालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.