भोर: शहरातील पारंपरिक प्रथा व सामाजिक हित जोपासणारे अखिल भोरेश्वरनगर मंडळाने सामाजिक हित जोपासत गणेशोत्सवानिमीत्त जगातील सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या शिबिराचे आयोजित केले. या शिबिरात 47 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.
कै.सुयोग धुमाळ यांच्या स्मरणार्थ व गणेशोत्सवानिमित्त या रक्तदान शिबीराचे आयोजन या मंडळाने केले होते. चक्रेश्वर मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने चाकण ब्लड सेंटरतर्फे पुणे यांच्यावतीने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यावेळी मोरेश्वर मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत रक्तदान केले.
यावेळी भोर शिवसेना (शिंदेगट) अध्यक्ष अनिल भेलके, मंडळाचे अध्यक्ष तुषार भोकरे, उपाध्यक्ष अजय पवार, खजिनदार आदर्श गाडे, तसेच नांदगावचे कार्यक्षम पोलीस पाटील निलेश सावंतसह मंडळातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.